✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २७ ऑक्टोबर २०२५ | पुण्यातील जैन बोर्डींग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय बिल्डर विशाल गोखलेंनी घेतला आहे. जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखलेंनी ई-मेलद्वारे ट्र्स्टला कळवल्याचे समोर आले आहे.नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. याशिवाय जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असंही गोखलेंनी म्हटलंय.
जैन मुनींना उपोषणासाठी परवानगी नाकारली?
जैन मंदिर आणि कबुतरखान्यांच्या रक्षणासाठी, गाईंच्या, गोरक्षणाच्या रक्षणासाठी जैन मुनी निलेश चंद्र विजय यांनी येत्या 1 नोव्हेंबरला आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र त्यांच्या या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. सुट्टीचा दिवस आणि मनसेचा नियोजित मोर्चा या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात आल्याचं समजतं. जैन मुनींचं हे आंदोलन आता 3 नोव्हेंबरला होणारेय. मुनी निलेश चंद्र विजय यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. मात्र 3 नोव्हेंबरला सोमवार असल्यामुळे जैन समाजाकडून प्रतिसाद मिळणार का यासंदर्भात शंका उपस्थित केली जातेय.
