![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ नोव्हेंबर २०२५ |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. आजचा दिवस चांगला जाईल. समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील. आपले कौतुक केले जाईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
तिखट पदार्थांचे सेवन करू नका. व्यवसायात तडजोड करावी लागेल. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
आपला विचार जवळच्या व्यक्तीसमोर मांडा. दिवस उत्साहात जाईल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा. कोणाबद्दलही वाईट चिंतू नका. सारासार विचार करून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
नोकरी, व्यवसायात घाई टाळावी. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल. यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. जनसंपर्कात वाढ होईल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव दिसून येईल. परोपकाराची भावना प्रबळ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. आत्मविश्वासाने केलेली कामे यशकारक ठरतील.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
घरासाठी नवीन खरेदी कराल. स्पर्धेत यश मिळेल. आजचा दिवस शुभ असेल. कष्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मन प्रसन्न राहील.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
नातेवाईकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाने मुलाखत द्या. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
मित्रांशी दुरावलेले संबंध सुधारतील. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. मुलांच्या कृतीने मान उंचावेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
आजचा दिवस शुभ ठरेल. हातातील कामात यश येईल. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. कठोर मेहनतीने मनोकामना पूर्ण कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू नका. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. फार विचार करण्यात वेळ घालवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नको त्या प्रलोभनात अडकू नका.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
महत्त्वाच्या निर्णयात गोंधळू नका. स्वत:च्या कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा. मिळकत वाढीस लावण्याचे मार्ग शोधाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
हातातील काम सोडून भलत्याच्या मागे धावू नका. न पटणार्या गोष्टी करू नका. उगाचच चिडचिड करू नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. गुरुप्रती निष्ठा कायम ठेवावी.