![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १५ नोव्हेंबर २०२५ – नोव्हेंबरच्या सुरुवातीला पडलेल्या पावसाने चिंता वाढवली होती. मात्र आता थंडीची एंट्री जोरदार होताना दिसतेय. राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा वेगाने घसरतोय. येत्या विकेंडला आणि सोमवारी नागरिकांना गारठ्याचा सुंदर अनुभव घेता येणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
थंडी वाढण्यामागील कारणे:
उत्तरेकडील शीत वाऱ्यांनी दिशा बदलून महाराष्ट्राकडे झेप घेतली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट निर्माण झाली असून ती पुढील काही दिवस टिकणार आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 11 अंशांच्या खाली जात असल्याने कमाल तापमानातही लक्षणीय घट होत आहे.
थंडीची लाट कधी मानली जाते?
किमान तापमान 10°C खाली गेल्यास
किंवा सरासरीपेक्षा 4.5°C पेक्षा जास्त घट झाली तर
अशावेळी ‘Cold Wave’ जाहीर केली जाते.
मुंबईतही वाढणार गारठा:
शुक्रवारी मुंबईत किमान तापमान 18.4°C होते.
शनिवार–सोमवार: तापमान 16–17°C दरम्यान राहण्याची शक्यता
मुंबईकरांना यामुळे बोचरी थंडीचा आनंद घेता येणार आहे.
माथेरानमध्येही किमान तापमान 18°C नोंदले गेले असून विकेंडला दोन्ही ठिकाणी गारवा वाढणार आहे.
पुढील 2 आठवड्यांचा अंदाज:
14–20 नोव्हेंबर
21–27 नोव्हेंबर
या दोन आठवड्यांत महाराष्ट्र व मध्य भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यापेक्षा कमी राहणार आहे.
