✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १७ नोव्हेंबर २०२५ | राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या (ATS) ९ ऑक्टोबर रोजीच्या छापेमारीत पुण्यातील एका आयटी अभियंत्याचे धक्कादायक दहशतवादी मनसुबे उघड झाले आहेत. १५ वर्षांहून अधिक काळ नामांकित आयटी कंपन्यांत काम केलेल्या झुबेर हंगरगीकर या अभियंत्याकडे अल-कायदा आणि कट्टरवादाशी संबंधित साहित्य, बॉम्बनिर्मिती मार्गदर्शक आणि ‘जिहाद’ प्रशिक्षणाची पुस्तके मोठ्या प्रमाणात आढळली. यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
शिक्षण व व्यावसायिक पार्श्वभूमी
एटीएसच्या सूत्रांनुसार, झुबेरने सोलापूरमधील एका प्रमुख तंत्रज्ञान संस्थेतून बी.ई. पदवी, तर प्राथमिक शिक्षण सोलापूरच्या उर्दू हायस्कूलमध्ये पूर्ण केले.त्याने प्रथम हिंजवडीतील आयटी कंपनीत काम केले आणि २०१२ पासून कल्याणी नगर येथील सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. कोविडनंतर तो वर्क-फ्रॉम-होम आणि ऑफिस अशा मिश्र पद्धतीने काम करत होता.
कट्टरवादाकडे झुकाव — तपासात चिंताजनक तथ्ये
तांत्रिक क्षेत्रातील अनुभवी असूनही झुबेरच्या विचारसरणीत धार्मिक अतिरेकीपणा झपाट्याने वाढल्याचे उघड झाले.
घरामध्ये कट्टर धार्मिक नियमांची सक्ती, लोकशाहीविरोधी चर्चांचा प्रचार आणि युवकांना लोकशाही बहिष्काराचे आवाहन— हे सर्व तो गेल्या काही वर्षांपासून करत असल्याचा तपासात दावा आहे.
२०१५ च्या सुमारास पुणे आणि हैदराबादमधील संशयित अतिरेकी घटकांशी त्याचा संपर्क आला. त्यानंतर त्याने मध्यपूर्व, अफगाणिस्तान पाकिस्तान येथील कट्टर प्रवक्त्यांचे साहित्य वाचण्यास सुरुवात केली आणि अशा पुस्तकांचा मोठा संग्रह तयार केला. इंटरनेटद्वारेही त्याने अतिरेकी माहिती मोठ्या प्रमाणात डाउनलोड केली होती. डिजिटल पुरावे : अल-कायदा मासिके, बॉम्ब मॅन्युअल झुबेरच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधून जे आढळले, ते अत्यंत गंभीर मानले जात आहे— अल-कायदाच्या अनेक डिजिटल मासिके ‘जिहाद’, ‘शहादत’, ‘लोन-वुल्फ हल्ले’, ‘गनिमी तंत्र’ यावरील लेख बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतींची मार्गदर्शक पुस्तिका भारतात हिंसक जिहादद्वारे ‘खिलाफत’ स्थापनेचे आवाहन करणारे साहित्य फॉरेन्सिक विश्लेषणात तो IED, स्फोटके आणि गनिमी युद्ध तंत्रज्ञान यावरील प्रशिक्षण सामग्रीचे व्यवस्थित अध्ययन केलेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सोशल मीडिया नेटवर्क — युवकांना कट्टरवादाकडे ढकलण्याचा प्रयत्न झुबेर हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कट्टरपंथी गटांचा सक्रिय सदस्य होता. स्वतःचे गट तयार करून त्यामधून तो युवकांमध्ये:‘गजवा-ए-हिंद’‘शरियत राज’‘खिलाफत स्थापन’ अशा संदेशांचा प्रसार करत होता. लोकशाहीविरोधी विचार आणि भारताच्या सीमांचा ‘निर्मूलन’ अशा संकल्पना त्या गटांमध्ये चर्चिल्या जात होत्या.
गुप्त बैठका — पुणे, सोलापूर, ठाणे येथे कार्यशाळांचे आयोजन
पोलिस तपासात असेही दिसून आले की झुबेरने पुणे, सोलापूर आणि ठाणे येथे गुप्त सत्रांचे आयोजन केले होते. या बैठकीत तो युवकांना जिहाद हाच शरियत स्थापनेचा मार्ग असल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न करत होता.
९ ऑक्टोबरची छापेमारी
एटीएसने कोंढवा, खडकी आणि वानवडी परिसरात छापे टाकून १८ जणांची तपासणी केली होती.
या कारवाईत जप्त केलेल्या साहित्याच्या फॉरेन्सिक तपासात अत्यंत धोकादायक आणि अतिरेकी स्वरुपाचा डिजिटल व भौतिक साठा आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली.
