![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. १९नोव्हेंबर २०२५ | पुणेकरांसाठी सकाळीच त्रासदायक बातमी. सिंहगड रोड परिसरात आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. उड्डाणपूल आणि खालचा रस्ता—दोन्ही ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहने पूर्णपणे अडकून पडली आहेत.
➡️ ऑफिस आणि शाळेला जाणाऱ्यांचे हाल
या कोंडीमुळे:
ऑफिसकडे निघालेल्यांना मोठा मनस्ताप
शाळकरी मुलांना व पालकांना गैरसोय
सर्वच मार्गांवर वाहतुकीचा वेग अत्यंत मंद
प्राथमिक माहितीनुसार, एक जेसीबी बंद पडल्यामुळे वाहतुकीचा पूर्ण ताळमेळ बिघडला आणि काही मिनिटांतच मोठी कोंडी तयार झाली.
➡️ सिंहगड रोडवर कोंडी नित्याचीच!
अलीकडेच उड्डाणपूल सुरू झाला असला तरी सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे.
आजच्या कोंडीने तर नेहमीपेक्षा अधिक अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे.
➡️ वाहतूक पोलीस घटनास्थळी
वाहतूक पोलिसांचे पथक तात्काळ दाखल झाले असून,
✔️ वाहने बाजूला काढणे
✔️ ट्रॅफिक डायव्हर्जन
✔️ रस्त्यावरचा ताण कमी करणे
यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
