✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २५ नोव्हेंबर २०२५ | खोस्तमध्ये नरसंहार; ९ लेकरांसह १० जण ठार — सीमेवर पुन्हा धगधग पाकिस्तान–अफगाणिस्तान सीमारेषेवरचं तणावाचं अंगार पेटलाच होता… त्यावर पाकिस्तानने मध्यरात्री पुन्हा एकदा “हवाई धाड” टाकली.
ज्यावेळी लोक स्वतःच्या घरात निवांत झोपले होते,त्याच वेळी पाकिस्तानने अफगाण चाैक्यांवर नव्हे…थेट घरांवर बॉम्ब टाकून निष्पाप नागरिकांना टार्गेट केलं!
अफगाण प्रवक्ते जबीहुल्लाह सांगतात —
रात्री १२ वाजता पाकिस्तानी विमानं खोस्तवर घोंगावली आणि क्षणात मृत्यूचा स्फोट. या हल्ल्यात ९ मुलांसह १० जण ठार, अनेकजण जखमी.
खोस्त, कुनार, पाक्तिका — संपूर्ण पट्टा हादरला.नुकसानदार घरं, उद्ध्वस्त वस्त्या आणि सीमेवर पुन्हा उसळलेला तणाव…
काही दिवसांपूर्वीच 50 पेक्षा जास्त पाक सैनिक ठार करणाऱ्या अफगाण प्रतिहल्ल्याची पाकिस्तानला खूपच चीड लागली होती का? की नेहमीप्रमाणे — दुर्बळांवरच जोर आजमावण्याची जुनाट सवय?
सौदी आणि इराणने शांततेचं आवाहन करूनही, पाकिस्तानने पुन्हा बारुदाची पिशवी हलवली. आता प्रश्न फक्त एक —अफगाणिस्तान हा वार गिळून टाकणार की परतवून लावणार?
सीमेवरची धगधग वाढतेय…आणि या पार्श्वभूमीवर भारतीय लष्करही हाय-अलर्ट मोडवर.
