महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ११ सप्टेंबर -महाराष्ट्राला आणि मुंबईतील नागरिकांना मुंबई पोलिसांचे कर्तृत्व चांगलेच माहीत आहे. पोलिसांचा अनुभवही आहे. यामुळे मुंबईची तुलना जर कोणी पाकिस्तानशी केली तर जास्त गांभीर्याने घेऊ नका. आपल्याला हे टाळायला हवे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरसोबत केल्यानंतर तसेच मुंबई पोलिसांवरील तिच्या वक्तव्यामुळे सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजकीय वातावरणही ढवळून निघाले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार यांनी पोलिसांचे कर्तृत्व नागरिकांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे अशा गोष्टींना अधिक महत्त्व देऊ नये. अशा व्यक्तींना अधिक महत्त्व दिल्याने जनमानसावर काय परिणाम होतो हे सुद्धा पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. मला धमक्यांचे सात फोन आले आहेत. यापूर्वीही अनेकदा धमक्यांचे फोन आले होते. मात्र अशा धमक्यांना मी गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट केले.