✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ नोव्हेंबर २०२५ | अमेरिकेच्या व्हाईट हाऊसजवळ झालेल्या धक्कादायक गोळीबारानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट कठोर पावले उचलली आहेत. हल्लेखोर अफगाणिस्तानचा नागरिक असल्याचे निष्पन्न होताच अमेरिकेने अफगाण पासपोर्टधारकांसाठी व्हिसा प्रक्रिया तात्काळ स्थगित केली आहे.
गोळीबारात एका नॅशनल गार्डचा मृत्यू
२६ नोव्हेंबरला रहमानउल्लाह लकनवाल या अफगाण नागरिकाने व्हाईट हाऊसजवळ दोन नॅशनल गार्ड्सवर गोळीबार केला.
रॉयटर्सच्या माहितीनुसार, २० वर्षीय सारा बेकस्ट्रॉमचा मृत्यू, तर २४ वर्षीय अँड्र्यू वूल्फ गंभीर जखमी आहे. या प्रकरणाने अमेरिकन सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
President Trump’s State Department has paused visa issuance for ALL individuals traveling on Afghan passports.
The United States has no higher priority than protecting our nation and our people. https://t.co/HuR1Lj7F9t
— Secretary Marco Rubio (@SecRubio) November 28, 2025
ट्रम्प प्रशासनाचा झपाट्याने निर्णय
अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी X वर लिहिले— “अफगाण पासपोर्टवर प्रवास करणाऱ्यांना व्हिसा देणे थांबवले आहे. अमेरिकन नागरिकांचे रक्षण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य.”
ट्रम्प यांच्या आदेशानंतर
USCIS ने प्रत्येक स्थलांतरिताचे पार्श्वभूमी तपास पूर्ण होईपर्यंत सर्व आश्रय निर्णय गोठवले आहेत.
USCIS संचालक जोसेफ अल्डो म्हणाले—“सर्व विदेशी व्यक्तींची नव्याने काटेकोर तपासणी होणार.”
ट्रम्प अजून कठोर; गैर-नागरिकांचे फायदेही बंद?
गोळीबारानंतर ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले—“देशात असलेल्या गैर-नागरिकांना मिळणारे सर्व संघीय फायदे व अनुदाने बंद करणार आहोत.” अमेरिका सध्या शून्य-तडजोड धोरणावर असल्याचे या निर्णयांवरून स्पष्ट दिसते.
