VIDEO : केस पकडून जमिनीवर फेकलं! पाकिस्तानमध्ये पोलिसांचा मुख्यमंत्र्यावर हात — इम्रान खान बेपत्ता? नेमकं काय सुरू आहे?

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ नोव्हेंबर २०२५ | पाकिस्तानमध्ये राजकीय वादळ अधिकच तीव्र होत असताना माजी पंतप्रधान इम्रान खान बेपत्ता झाल्याची, अगदी मृत्यूच्या अफवांपर्यंत चर्चा रंगली आहे. रावळपिंडीतील अदियाला तुरुंगाबाहेर PTI कार्यकर्ते आंदोलकांचा रेलचेल तशीच आहे. खान यांचे पुत्र कासिम खान यांनी थेट आरोप केला— “आठवड्यांन्‌आठवडे वडिलांना एकांतवासात ठेवलं, कुटुंबीयांना भेटू दिलं जात नाही.”दरम्यान, परिस्थिती आणखी चिघळत असताना खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी तुरुंगाबाहेर पोहोचताच पोलिसांनी अक्षरशः ‘हात उचलला’ अशी धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांकडून मुख्यमंत्री आफ्रिदींची उघड मारहाण!
समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं की, पोलिसांनी आफ्रिदींचे केस पकडले, जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुमारे महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आफ्रिदींवरील ही वागणूक पाकिस्तानातील राजकीय अस्थिरतेचं स्पष्ट चित्र उभं करते. विशेष म्हणजे खैबर पख्तूनख्वा हा PTIचं सरकार असलेला एकमेव प्रांत आहे.

इम्रान खानबाबत गूढ अधिक गडद
विश्वचषक विजेते कर्णधार आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान २०२३ पासून अदियाला तुरुंगात आहेत. परंतु सध्या चालू असलेल्या अफवांनी चर्चेला तोंड फुटलं आहे—

“इम्रान खान मृत झाले?”
“त्यांना गुपचूप हलवण्यात आलं?”

यावर प्रतिसाद देताना पाकिस्तानचे गृहराज्यमंत्री तलाल चौधरी म्हणाले: “इम्रान खान पूर्णपणे ठीक आहेत. त्यांना सर्व सुविधा दिल्या जात आहेत.” मात्र त्यांच्या परिवाराचा आरोप तसाच— “आम्हाला भेटू दिलं जात नाही. माहिती दिली जात नाही.”

१६ तासांचा ठिय्या आंदोलन
इम्रान खान यांना भेटण्यासाठी गुरुवारी (२७ नोव्हेंबर) आफ्रिदी तुरुंगाबाहेर पोहोचले. परंतु पोलिसांनी सरळ प्रवेश नाकारला. त्यानंतर त्यांनी PTI समर्थकांसह तिथेच १६ तास ठिय्या आंदोलन सुरू ठेवलं.शुक्रवारी आंदोलन मागे घेतलं, पण प्रश्न तसेच अनुत्तरित!

आफ्रिदींचा सवाल अजूनही गंभीर आहे— “मला भेटू दिलं नाही… त्यांच्या प्रकृतीविषयी कुठलीच माहिती देत नाहीत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *