![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक २ डिसेंबर २०२५ | दूरसंचार विभागाने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी एक नवा ‘डिजिटल नियम’ जाहीर केला आहे. आता बाजारात येणाऱ्या प्रत्येक नवीन मोबाइलमध्ये Sanchar Saathi अॅप प्री-इन्स्टॉल असणारच—ना डिलिट, ना डिसेबल! फोन सेटअप करतानाच हे अॅप डोळ्यासमोर येणार आणि मोबाईल निर्मात्यांना ते पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवणे बंधनकारक असेल. कारण उद्दिष्ट एकच—बनावट IMEI, डुप्लिकेट फोन आणि सायबर गुन्ह्यात वापरल्या जाणाऱ्या हँडसेटचा बंदोबस्त!
Sanchar Saathi म्हणजे नेमकं काय? तर हे अॅप तुमच्या फोनचा IMEI नंबर पडताळून देते. नेटवर्कमध्ये एकच IMEI दोन फोनवर वापरला जात असल्यास ते त्वरित लक्षात येतं. सेकंड-हँड मार्केटमध्ये विकले जाणारे चोरीचे फोन, बदललेले IMEI, आणि त्यातून होणारे डेटा-फसवणुकीचे तांडव—या सगळ्यावर सरकारने इथे मोठा ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारचं म्हणणं स्पष्ट—देशात सेकंड-हँड स्मार्टफोनचा पूर आला आहे. त्यात व्हायरस, स्पायवेअर, बदललेले सॉफ्टवेअर, आर्थिक फसवणूक… अशा धोक्यांची भरमार. Sanchar Saathi अॅपमुळे ग्राहक फोन खरेदी करण्याआधीच ब्लॉक IMEI, डुप्लिकेट डिव्हाइस ओळखू शकणार. “योग्य फोनच तुमच्या हातात
