क्रिकेटप्रेमींसाठी ६ डिसेंबर खास; तब्बल ११ क्रिकेटपटूंचा वाढदिवस! ‘Birthday Special-11’ जाणून घ्या

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ६ डिसेंबर २०२५ | क्रिकेटविश्वात ६ डिसेंबर हा दिवस नेहमीच वेगळा ठरतो. कारण आजचा दिवस आहे क्रिकेटपटूंच्या ‘मेगा बर्थडे’ चा! एक-दोन नव्हे तर तब्बल ११ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचा वाढदिवस एकाच दिवशी येतो, त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी हा दिवस उत्साहाचा सोहळा बनतो. सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

५ भारतीय दिग्गजांचा एकाच दिवशी वाढदिवस
आजच्या ‘बर्थडे ब्रिगेड’मध्ये पाच भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.

रवींद्र जाडेजा – ३७ वर्ष
जसप्रीत बुमराह – ३२ वर्ष
श्रेयस अय्यर – ३१ वर्ष

यापैकी रवींद्र जाडेजा आजच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या वनडेत मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर करुण नायर आणि माजी गोलंदाज आरपी सिंह यांचाही आज वाढदिवस आहे. करुण नायर अलीकडे भारतीय संघात पुनरागमनासाठी झगडत आहे, तर आरपी सिंह क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

आंतरराष्ट्रीय तारेही वाढदिवस साजरा करताना
६ डिसेंबर हा दिवस फक्त भारतीय खेळाडूंचाच नव्हे तर काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंचादेखील खास आहे.
पाकिस्तानचा माजी सलामीवीर नासिर जमशेद
इंग्लंडचा करिष्माई ऑलराउंडर अँड्र्यू फ्लिंटॉफ
न्यूझीलंडचा अष्टपैलू ग्लेन फिलिप्स
आयर्लंडचा स्टार युवा फलंदाज हॅरी टेक्टर
यांच्या वाढदिवसामुळे क्रिकेटविश्वात सोशल मीडियावर शुभेच्छांची धडाकेबाज चलती आहे.

Birthday Special-11 : आजच्या वाढदिवसांचे ‘ड्रीम टीम’
६ डिसेंबरला वाढदिवस असलेल्या ११ क्रिकेटपटूंना एकत्र खेळवले, तर अशी बनेल आजची ‘बर्थडे प्लेइंग इलेव्हन’ :

1. नासिर जमशेद (पाकिस्तान)
2. शॉन इरवाइन (झिंबाब्वे)
3. श्रेयस अय्यर (भारत)
4. हॅरी टेक्टर (आयर्लंड)
5. करुण नायर (भारत)
6. ग्लेन फिलिप्स (न्यूझीलंड)
7. अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड)
8. रवींद्र जाडेजा (भारत)
9. जसप्रीत बुमराह (भारत)
10. डेवाल्ड प्रिटोरियस (दक्षिण आफ्रिका)
11. आरपी सिंह (भारत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *