✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी – मंगेश खंडाळे| दि. ३ जानेवारी २०२६ | राजकारणात बोलण्याची सवय अनेकांना असते; पण प्रभाग क्रमांक १५ मध्ये बोलण्याआधी काम झाल्याचं चित्र दिसतंय. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित राजेंद्र गावडे, राजू उर्फ शरद दत्ताराम मिसाळ, शैलजा अविनाश मोरे आणि शर्मिला राजू बाबर, यांनी जनतेशी थेट संवाद साधत प्रभागातील विविध सोसायट्यांना भेटी दिल्या आणि “आम्ही काय बोलतोय” यापेक्षा “आम्ही काय केलंय” हे ठामपणे मांडलं.
या जनसंवाद दौऱ्यात उमेदवारांनी शितल छाया हाऊसिंग सोसायटी, प्रबोधन सोसायटी, अपूर्व सोसायटी, होरायझन सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नंदादीप सोसायटी, पंचतारा हाऊसिंग सोसायटी, काळभैरवनाथ सोसायटी, श्रीनिवास हाउसिंग सोसायटी, सिद्धिविनायक सोसायटी, ध्रुवदर्शन सोसायटी, गणेश भाग सोसायटी तसेच स्वप्नपूर्ती सोसायटी (फेज १) या ठिकाणी भेटी दिल्या.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुपजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोबतच सलीम भाई शिकलगार, अनिल जांभळे, देविदास सांगडे, कैलास शिरकांडे, योगेश जाधव, समीर थोपटे, विजय रणदिवे, राकेश शेट्टी, अविनाश पाखरे, तेजस ढेरे, अमोल धुमाळ, दीपक जाधव, मिलिंद चौधरी, शंकर काका आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी नागरिकांशी संवाद साधताना उमेदवारांनी सांगितले की, गेल्या नऊ वर्षांच्या कालावधीत प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते विकास, ब्लॉक बसविणे आदी अनेक मूलभूत समस्या सोडविण्यात आल्या आहेत. या चार नगरसेवकांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासकामे पूर्ण झाली असून, येत्या काळात प्रभागाला अधिक स्मार्ट आणि सुविधायुक्त बनवण्यासाठी आम्ही चौघेही एकत्रित विचाराने पुन्हा जनतेसमोर आलो आहोत.
प्रभाग अधिक स्मार्ट, अधिक सुविधायुक्त आणि अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी चार चेहरे – एक विचार घेऊन आपण पुन्हा जनतेसमोर आलो आहोत, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं. थोडक्यात काय, प्रभाग १५ मध्ये राजकारण कमी आणि कारभार जास्त दिसतोय!
