महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी | दि. ५ | शिवतीर्थ प्रतिष्ठान, मित्र मंडळ शिवमुद्रा ग्रुप, शिवशक्ती मित्र मंडळ आणि स्वामी विवेकानंद मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा गड परिसरात प्रचाराचा दणदणीत शुभारंभ झाला. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अनुपजी मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अमित राजेंद्र गावडे, राजू ऊर्फ शरद दत्ताराम मिसाळ, शैलजा अविनाश मोरे आणि शर्मिला राजू बाबर यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. या प्रचाराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, प्रत्येक घरातून ओवाळणी देत उमेदवारांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी माजी महापौर आर. एस. कुमार, श्री बोर्लीकर काका, मिलिंद कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, अरुण थोरात, विजय पोळ, अविनाश गायकवाड, अभिजित पासलकर, तेजस ढेरे, सलीम भाई शिकलगार यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच योगेश भागवत, आनंद देशमुख, किरण पोतनीस, सौरभ पानसे, योगेश आचार्य, सुनील जमखंडीकर, सचिन कदम, अभिजीत इंगवले, योगेश मदने, प्रमोद सपकाळ, अभिजीत ढेरे, राहुल वलेकर, रंजीत इंगवले, प्रताप सोमवंशी, आप्पा गायकवाड, दीपक खैरे, किरण यादव, श्रीतेज गवळी, अभिजीत माळी, हेमंत भोसले, स्वप्निल मदने, अशोक काचोळे, बाळू वारंग, आकाश झगडे, महेश महाजन, संतोष ढाणे, अक्षय मोरे, विनय पवार, अनिल शेलार, कुलदीप झगडे, विनायक काकडे, माणिक फडतरे, प्रवीण निकम, अमर मतकर, सुशांत चव्हाण आदी कार्यकर्त्यांची भक्कम उपस्थिती लाभली.
प्रचारादरम्यान गड परिसरातील नागरिकांनी उमेदवारांशी विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर मोकळा संवाद साधला. महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. “घराघरांतून मिळणारा आशीर्वाद हीच आमची खरी ताकद आहे,” असे उमेदवारांनी यावेळी सांगितले. नागरिकांच्या उत्साहामुळे प्रचाराला हळूहळू विजयी रॅलीचे स्वरूप प्राप्त झाले.
एकूणच, संघटित कार्यकर्ते, व्यापक उपस्थिती आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे भाजपच्या प्रचाराला गड परिसरात भक्कम प्रारंभ मिळाला आहे. या प्रचारातून निर्माण झालेला सकारात्मक माहोल येत्या निवडणुकीत निर्णायक ठरेल, असा विश्वास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
