महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी – मंगेश खंडाळे | दि. ६ | प्रभाग क्रमांक १५ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी केलेला जनसंवाद हा केवळ प्रचारापुरता मर्यादित न राहता लोकशक्तीशी नातं दृढ करणारा ठरला. अमित राजेंद्र गावडे, राजू उर्फ शरद दत्ताराम मिसाळ, शैलजा अविनाश मोरे आणि शर्मिला राजू बाबर या उमेदवारांनी सकाळी माऊली गार्डन, सेक्टर २७ आणि संत तुकाराम गार्डन, सेक्टर २७ येथील नागरिकांशी थेट संवाद साधत परिसरातील प्रश्नांना कान दिला. सकाळच्या शांत वातावरणात झालेल्या या भेटीमुळे नागरिकांनीही आपले प्रश्न मोकळेपणाने मांडले.

या संवादादरम्यान भाजप उमेदवारांनी विकासाचा दृष्टिकोन स्पष्ट करताना सांगितले की, प्रभागाचा सर्वांगीण विकास हा पक्षाचा मुख्य अजेंडा आहे. रस्ते, पाणी, स्वच्छता यांसोबतच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांसाठी विशेष योजना राबवण्यावर भर दिला जाईल. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचा आगामी नियोजनात समावेश केला जाईल, असे आश्वासन देत उमेदवारांनी पारदर्शक व जबाबदार कारभाराची ग्वाही दिली.
या जनसंवादातून नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, “नेते आमच्यापर्यंत येतात, आमचे प्रश्न ऐकतात,” अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. सकाळी सकाळी झालेल्या या भेटीमुळे उमेदवार आणि मतदार यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे. प्रभाग क्रमांक १५ मध्ये विकास, विश्वास आणि संवाद या त्रिसूत्रीवर आधारित नेतृत्व देण्याचा निर्धार भाजप उमेदवारांनी यावेळी ठामपणे मांडला.
