![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २३ जानेवारी | सोन्याच्या दराने आज विक्रमी वाढ नोंदवली आहे. मागील काही दिवसांतील चढ-उतारानंतर आज सोन्याचे दर उच्चांकावर पोहोचले आहेत. १ तोळा सोन्याचे दर ५,४०० रुपयांनी वाढून १,५९,७१९ रुपये झाले आहेत. यामुळे १ तोळा सोनं जवळपास १ लाख ६० हजारांवर विकले जात आहे. मागील तीन दिवसात सोन्याचे दर जवळपास १० हजार रुपयांनी वाढले आहेत, तर दोन दिवसांपूर्वी दरात मोठी वाढ झाली होती आणि नंतर थोडी घट झाली होती. आता पुन्हा सोन्याचे दर उच्चांक गाठत आहेत.
२४ कॅरेट सोनं:
आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ५,४०० रुपयांनी वाढले आहेत. ८ ग्रॅममागे सोनं ४,३२० रुपयांनी महागून १,२७,७६८ रुपये झाले आहे. १० तोळ्यामागे सोन्याचे दर ५४,००० रुपयांनी वाढून १५,९७,१०० रुपये झाले आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक नोंदवलेली किंमत आहे.
२२ आणि १८ कॅरेट सोनं:
२२ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ४,९५० रुपयांनी वाढले असून ते १,४६,४०० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ३,९६० रुपयांनी वाढून १,१७,१२० रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ४९,५०० रुपयांनी वाढ झाली असून १४,६४,००० रुपये झाले आहेत.
१८ कॅरेट सोन्याचे दर ४,०५० रुपयांनी वाढून १,१९,७८० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅममागे ३,२४० रुपयांनी वाढ झाली असून ९५,८२४ रुपये झाले आहेत. १० तोळ्यामागे ४०,५०० रुपयांनी महागले असून ११,९७,८०० रुपये झाले आहेत.
सोन्याच्या दरात या विक्रमी वाढीमुळे गुंतवणूकदार, दागिन्यांचा व्यवसाय आणि ग्राहक सर्वांचे लक्ष या बाजारावर लागले आहे. मागील आठवड्यातील चढ-उतार पाहता, सध्याचे दर ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचले आहेत.
