स्थावर मालमत्ता खरेदी झाली स्वस्त; राज्य शासनाकडून मुद्रांक शुल्कात सूट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १९ सप्टेंबर -:कोविड-१९ मुळे विस्कळीत झालेल्या आर्थिक व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थावर मालमत्ता खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. शासनाने मुद्रांक शुल्कात सूट दिल्याने आता स्थावर मालमत्ता खरेदी आता स्वस्त झाली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थावर मालमत्ता खरेदी क्षेत्राला आलेल्या मरगळीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी राज्याच्या महसूल विभागानं हा निर्णय घेतला असून त्यानुसार, सदनिका, दुकान, प्लॉट, शेतजमीन आदी मिळकतींच्या खरेदीखत किंवा विक्री करारपत्राच्या दस्तऐवजावरील मुद्रांक शुल्कात सूट देण्यात आली आहे.

या निर्णानुसार, १ सप्टेंबर २०२०पासून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये मालमत्ता घरेदीसाठी आता २ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल जे पूर्वी ५ टक्के होते. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी मुद्रांक शुल्क ज्या ठिकाणी पूर्वी ६ टक्के होतं तिथे आता ३ टक्के आणि जिथे ५ टक्के होतं तिथे २ टक्के असणार आहे.

त्याचबरोबर १ जानेवारी २०२१ पासून ३१ मार्च २०२१ पर्यंत मुंबई आणि उपनगरात पूर्वीच्या ५ टक्क्यांऐवजी ३ टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे. तर उर्वरित महाराष्ट्रासाठी जिथे ६ टक्के मुद्रांक शुल्क होतं तिथं आता ४ टक्के असेल तर जिथं ५ टक्के मुद्रांक शुल्क होतं तिथं ३ टक्के असेल.

त्यामुळे महसूल विभागाकडून या सवलतींचा फायदा घेण्यासाठी आणि शासनाच्या महसूलात भर टाकण्याच्या दृष्टीने मिळक खरेदी दस्ताऐवजाच्या नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *