औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी थेट कोविड केंद्रात औषधे पाठवा, हायकोर्टात याचिका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १९ सप्टेंबर -: कोविडवर रामबाण उपाय ठरणाऱया रेमेडिसीकिर, फॅबी फ्लू आणि ऍक्टेम्रा इंजेक्शन ही औषधे काळ्याबाजारात विकली जात असून त्यांचा तुटवडा निर्माण होत आहे. औषधांचा हा काळाबाजार रोखण्यासाठी ही औषधे थेट कोविड केंद्रात अथवा क्वारंटाईन सेंटरमध्ये उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी करत मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाने या प्रकरणी सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

रेमेडिसीकिर या औषधाची किंमत 3 हजार रुपये असताना हे औषध काळ्या बाजारात 30 हजारांना विकले जात आहे. औषधांचा हा काळाबाजार रोखण्यात यावा अशी मागणी करत जयेश मिरानी यांच्या ऑल महाराष्ट्र ह्युमन राईट्स केल्फेअर असोसिएशनच्या वतीने ऍड. प्रशांत पांडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती के के तातेड आणि न्यायमूर्ती एन आर बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्याकेळी याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की कोविड औषधे पुरवणारे मुंबईत केवळ सहा पुरवठादार उपलब्ध आहेत. औषधां अभावी इतर रुग्णांचे हाल होत आहेत. ही औषधे कोविड रुग्णालयात पोहोचविल्यास गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळतील तसेच त्यांचे प्राणही वाचतील त्यावर सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया यांनी कोर्टाला सांगितले की काउंटरवर औषधे उपलब्ध करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी व्यवहार्य आहे की नाही हे तपासावे लागेल त्यासाठी कोर्टाने वेळ द्यावा हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकून घेत सरकारला 2 ऑक्टोबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *