मुंबईत अंडी, चिकन मागणी वाढल्याने भाव कडाडले

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १९ सप्टेंबर -: कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुंबईकरांनी अंड्यासह चिकनवर ताव मारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे या दोन्हीच्या मागणीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला असून गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात ७२ रुपये डझनने भाव असणारी अंडी आता 84 रूपये डझन झाली आहेत. तर चिकनचा भाव 40 रुपयांनी वाढून प्रति किलो 240 रुपये झाला आहे.

जगभरात कोरोना पसरल्यानंतर चिकन तसेच अंड्याबाबत वेगवेगळ्या अफवा परसल्या होत्या. त्याचा परिणाम चिकन आणि अंड्याच्या विक्रीवर झाला होता. फेब्रुवारीत विक्री 50 टक्क्याने घटली होती. त्यानंतर लॉकडाऊनने तर या व्यवसायाचे कंबरडेच मोडले होते. परीणामी पोल्ट्रीपार्म व्यवसायाला साधारणता 500 कोटी रूपयांचा आर्थिक फटका ही बसला होता. मात्र चिकनची मागणी वाढल्याने आता हळूहळू पुन्हा हा व्यवसाय पुर्वपदावर येत असल्याची तीन महिन्यांपुर्वी पोल्ट्रीफार्मवर एक कोंबडी 80 रूपये प्रतिकीलो विकली जात होती. त्यात आता 3 रूपयांची वाढ होऊन प्रतिकिलो 83 रूपये झाली आहे. तर किरकोळ बाजारात चिकन 240 रूपये प्रतिकिलो विकण्यात येत आहे.

मुंबईला दिवसाला 1 कोटी 80 हजारांच्या वर अंड्यांचा पुरवठा होतो. साधारणता मार्च ते मे च्या दरम्यान अंड्याची मागणी ही घटली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात अंड्याचा दर प्रति अंडे 5 रूपये इतका खाली आला होता. मात्र आता पुन्हा एकदा अंद्याचा पुरवठा वाढला असून अंड्याची दर ही वाढला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ बाजारात प्रति अंडे 6 रूपये असणारा दर आता 7 रूपयांवर पोचला आहे. सध्या अंडी 84 रूपये डझन ने विकली जात आहेत.

हॉटेल सुरू झाल्यानंतर मागणी वाढणार मुंबईत एकूण चिकन पैकी 25 टक्के चिकनचा पुरवठा हा हॉटेलला होत होता. सध्या हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद असल्याने हा पुरवठा ही बंद आहे. हॉटेल सुरू झाल्यास चिकनची मागणी 25 टक्के वाढण्याची शक्यता असून दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आरोग्यासाठी उत्तम
वर्क फ्रॉम होम जीवनशैली आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकते. आरोग्‍यदायी जीवनासाठी उत्तमरित्‍या नियोजित व केंद्रित आणि संतुलित पौष्टिक आहार ही काळाची गरज आहे. शारीरिक व मानसिक आरोग्‍य व्‍यक्‍ती सेवन करत असलेल्‍या अन्‍नावर अवलंबून असते. प्रथिने शरीरातील पेशी, स्‍नायू, त्‍वचा, उती व अवयवांच्‍या चांगल्‍या आरोग्‍यासाठी अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. चिकन व अंडी सारखे प्रथिनेयुक्‍त अन्‍नपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्‍यामध्‍ये कॅलरींचे कमी प्रमाण असण्‍यासोबत प्रथिने संपन्‍न प्रमाणात असतात, असे सुगुणा फूड्सचे कार्यकारी संचालक विग्‍नेश सौंदराराजन यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *