सारं जग लस च्या शोधात ; कोरोना च्या उगमस्थानी ( वुहान) सुरू आहेत पार्ट्या,

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – वुहान – दि. २३ सप्टेंबर – सारं जग लॉकडाऊनमध्ये गुदमरत असताना व कोरोना वर कोणतेही ठोस औषध नसतांना , तेच वुहान आहे जिथं गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्या वुहान शहरामध्ये जल्लोष सुरू आहे. चीनमध्ये समुद्र किनारी, म्युझिक फेस्टिव्हल आणि पार्ट्यांना गर्दी होत आहे. पण याच्या उलट चित्र बाकीच्या जगात दिसत आहे.15 ऑगस्ट 2020 ला वुहान शहराच्या मध्यभागी असलेल्या माया वॉटर पार्कमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. आता जग लॉकडाऊनमध्ये गुदमरत असताना वुहान शहरामध्ये जल्लोष सुरू आहे. तिथे कोरोनाचा प्रसार थांबला आहे. त्यामुळे ते पार्टीचा आनंद लुटू शकतात, असं तिथल्या सरकारचं मत आहे.

टाळ्यांचा आवाज, प्रेक्षकांचा जल्लोष हे जरी बाकीच्या जगासाठी आता या कोरोनाच्या काळात अनुभवणं कठीण असलं तरी वुहानमध्ये हे सर्व अनुभवता येऊ शकतं, कारण तिथे गेले अनेक महिने कोरोना रुग्ण नसल्याने सोशल डिस्टन्सिंग, मास्क हे सर्व नियम बंद झाले आहेत आणि त्या जागी लाईव्ह डीजे कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे.

जगाच्या इतर भागांत हे जरी अशक्य वाटत असले तरी वुहान आणि चीनच्या इतर भागांत हेच चित्र दिसत आहे. चीनमध्ये ७६ दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर एकही रुग्ण न सापडल्याने वुहान हे शहर कोरोनामुक्त झाले आहे पण त्या उलट अमेरिका आणि भारतामध्ये दिवसागणिक रुग्णाची संख्या वाढत आहे.

संपूर्ण जगात जरी बार आणि डिस्को हे काही नियम आणि अटींवर सुरू असले तरी वुहानमध्ये तरुणाई गाण्यांच्या तालावर झिंगताना दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *