धोनीची तुफानी फटकेबाजी, मैदानावरून चेंडू थेट स्टेडियमबाहेर गेला,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – शारजा – दि. २३ सप्टेंबर – आयपीएलमध्ये काल झालेल्या लढतीत राजस्थान रॉयल्सनेचेन्नई सुपर किंग्सवर मात केली. षटकार-चौकारांची बरसात आणि धावांचा पाऊस पडलेल्या या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सला विजयासाठी १६ धावा कमी पडल्या. या लढतीत चेन्नई सुपरकिंग्सचा पराभव झाला असला तरी शेवटच्या षटकांमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केलेली तुफानी फटकेबाजी चर्चेचा विषय ठरली आहे.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी फलंदाजीस उतरला तेव्हा सामना चेन्रई सुपरकिंग्सच्या हातातून जवळपास निसटला होता. दरम्यान अखेरच्या षटकामध्ये चेन्नईला विजासाठी ३८ धावांची गरज असताना धोनीने या षटकातील तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले. यापैकी एक षटकार एवढा उत्तुंग होता की, तो थेट स्टेडियमबाहेर जात रस्तावर पडला.

https://www.instagram.com/iplt20/?utm_source=ig_embed

धोनीचा हा जबरदस्त फटका कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपला. त्यामध्ये जे दृश्य दिसले ते आश्चर्याचा धक्का देणारे होते. धोनीने मारलेला हा षटकार स्टेडियमच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर पडला. तेवढ्यात एक माणूस तिथे आला. त्याने हसत हसत हा चेंडू उचलून, एक मौल्यवान वस्तू सापडल्याच्या आनंदात हा चेंडू आपल्यासोबत नेला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये टिपला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *