महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -संजीवकुमार गायकवाड -अंबाजोगाई – दि. २३ सप्टेंबर – अंबाजोगाई येथे लोखंडी सावरगाव परिसरात शासनाच्या वतीने कोवीड केअर सेंटरची उभारणी झाली आहे. १ हजार बेडच्या क्षमतेच्या या रुग्णालयात ८०० बेड उपलब्ध असल्याचे शासनाच्या वतीने सांगितले जाते. आज प्रत्यक्षात या ठिकाणी ३२५ बेडच उपलब्ध आहेत. रुग्णांसाठी वरदान ठरणाºया या हॉस्पिटलला सुसज्ज इमारत लाभली मात्र तज्ञ डॉक्टरांचा व साधनसामुग्रीचा अभाव असल्याने या रुग्णालयात रुग्णसेवेबाबत अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.
अंबाजोगाई परिसरात सात वर्षांपूर्वी मनोरुग्णालयाची नवीन इमारत कै.डॉ.विमल मुंदडा यांच्या संकल्पनेतून साकार झाली होती. या इमारतीत सुसज्ज असे स्त्री रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी शासन प्रयत्नशील होते.मात्र,अचानकच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लोखंडी सावरगाव येथील ही सुसज्ज इमारत सध्या कोविड केअर सेंटर म्हणून कार्यान्वित झाली आहे. अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला येणारा रुग्णांचा ताण दूर करण्यासाठी व अंबाजोगाईच्या रुग्णालयात परळी, केज, धारूर, माजलगाव व इतर ठिकाणचे रुग्ण उपचारासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने लोखंडी सावरगाव येथे शासनाच्या वतीने कोविड केअर सेंटर कार्यान्वित झाले. या कोविड सेंटरमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने या रुग्णालयात बेड अपुरे पडतात की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे. वैद्यकीय प्रशासनाच्या वतीने लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात ८०० बेड उपलब्ध आहेत. त्यातील आॅक्सिजनचे ४४८ व ६७ बेड व्हेटिलेटर असणारे आहेत. अशी माहिती दिली जाते. प्रत्यक्षात मात्र, ३२५ बेड उपलब्ध असून ३७० बेड अॅडजेस्ट करता येतात. आज या रुग्णालयात २६७ रुग्ण दाखल आहेत.
प्रशासनाच्या वतीने ४४८ आॅक्सिजन बेडचा उल्लेख दाखवला जातो. प्रत्यक्षात मात्र १४० आॅक्सिजन बेड उपलब्ध आहेत. बाकी इतर बेड उपलब्ध होण्यासाठी वेळ लागणार आहे. ८०० बेडची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सध्यातरी रुग्णालयात आॅक्सिजन प्लँट उभा करणे. नवीन जनरेटर बसवणे, स्ट्रीट लाईट बसवणे, पाण्यासाठी पाच हजार लिटरच्या १० टाक्या बसवणे, वॉर्ड बॉय, परिचारिका, टेक्निशियन यांच्या रिक्त जागा भरणे, ड्रेनेज लाईन उभी करणे. सध्या रुग्णालयात ६७ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी उपचार करणारे, भूलतज्ञ, चेस्ट फिजिशियन, फिजिशियन,पूर्णवेळ व शिफ्टवाईज आजही उपलब्ध नाहीत. या रुग्णालयासाठी सिटी स्कॅन मशीनची नितांत आवश्यकता आहे. यासर्व बाबी तात्काळ उपलब्ध झाल्या तर या रुग्णालयात ८०० बेड उपलब्ध होतील.अन्यथा हे रुग्णालय आहे या स्थितीत ३५० बेडचे आहे असेच म्हणावे लागेल.
*अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू -आ.नमिता मुंदडा*
रुग्णांची वाढती संख्या व अपुºया सुविधा यामुळे कोरोनाच्या रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध होत नाही. दर्जेदार सेवा देण्यासाठी शासनाने रिक्त जागा, आॅक्सिजन प्लँट,सिटी स्कॅन मशीन व सर्व प्रकारच्या तपासण्या रुग्णालयास उपलब्ध करून द्याव्यात.कोरोना रुग्णांसाठी हे रुग्णालय सुसज्ज व अत्याधुनिक करण्यासाठी आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे व सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. अशी माहिती आ.नमिता मुंदडा यांनी दिली.