महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २४ सप्टेंबर -उद्धव ठाकरे हे आजवरचे सर्वात निष्क्रीय मुख्यमंत्री आहेत. ते मातोश्री निवासस्थानाच्या बाहेर पडत नाहीत, असे एकना अनेक आरोप भाजपचे राज्यातील नेते करत असताना राज्यात करोनाकाळातही या महासंकटाशी लढा देत विकासाची कामे कशी सुरू होती, याचा लेखाजोखाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापुढे मांडला आहे.
करोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या सात राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रातील स्थितीची सर्वंकष माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधानांपुढे ठेवली. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेला कशाप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, हे सांगतानाच गेल्या सात महिन्यांत सरकारने आरोग्य क्षेत्रात जे भरीव काम केले आहे, त्याचा तपशील मुख्यमंत्र्यांनी सादर केला. सरकारने अर्थचक्राला गती देण्यासाठी त्वरेने घेतलेल्या निर्णयांची माहितीही ठाकरेंनी दिली. या माहितीचे मुद्दे पुढीलप्रमाणे…
माझे कुटुंब, माझी जबाबदारी :
करोना काळात राज्य सरकारने घेतलेले निर्णय:
राज्याचे अर्थचक्र वेगाने सुरू:
शाळा बंद पण शिक्षण सुरू:
पर्यटनाला चालना: