शिक्षण केवळ रोजगार मिळवून देणारे नसावे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – २५ सप्टेंबर -‘नव्या शैक्षणिक धोरणाने संस्कार, संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखित केले आहे. नव्या शैक्षणिक धोरणाने माता, मातृभाषा व मातृभूमी या विषयांवर भर दिला आहे. शिक्षण केवळ रोजगार मिळवून देणारे नसावे तर चारित्र्यवान नागरिक घडविणारे असावे असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सांगितले.

देशातील जुन्या व प्रतिष्ठेचे विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाब विद्यापीठाने `नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : अंमलबजावणीसाठी रोडमॅप’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी राजभवनातून व्हिडिओ काँन्फरन्सच्या माध्यमातून या चर्चासत्राचे उदघाटन केले. त्यावेळी ते बोलत होते.

देश स्वतंत्र झाल्यापासून शैक्षणिक धोरणांमध्ये अनेकदा नवनव्या संकल्पना राबविल्या गेल्या. मात्र एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये भारतीयतेचा अभाव होता. समग्र असलेल्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भारतीय नितीशास्त्रावर भर देताना संस्कार, संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखित केल्याचे ते म्हणाले. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने भारतीय नितीशास्त्रावर भर देताना संस्कार, संस्कृती व संस्कृत भाषेचे महत्व अधोरेखित केले आहे, नैतिक मूल्ये हा शिक्षणाचा मूलाधार असतो. मात्र सर्वधर्म समभावाच्या नावाखाली नैतिक मूल्ये, आचारविचार व चारित्र्य निर्माण या गोष्टी शिक्षणातून हद्दपार झाल्या अशी खंत राज्यपालांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *