![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ जुलै २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आवडते खाद्यपदार्थ खाल. सामाजिक कार्याबद्दल मनात ओढ निर्माण होईल. पैशाची गुंतवणूक योग्य सल्ल्याने करावी. गोड बोलण्याने इतरांवर छाप पाडाल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. मनातील जुनी हौस पूर्ण कराल. सर्व गोष्टींकडे आनंदी नजरेतून पहाल. नवीन मित्र जोडता येतील. दिवस मनाजोगा घालवाल.
मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
क्षणिक आनंदाच्या गोष्टी कराल. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाकाव्यात. काही गोष्टी लपविण्याकडे तुमचा कल राहील. उत्तम शय्यासौख्य लाभेल. हातातील कामाला यश मिळेल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
व्यवसायातून चांगली कमाई करता येईल. कामाच्या व्यापामुळे थकवा जाणवेल. पिछेहाटीला घाबरून जाऊ नका. मित्रांच्या ओळखीचा लाभ होईल. इतरांना स्वखुशीने मदत कराल.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
औद्योगिक वातावरण चांगले राहील. तुमच्या नियोजनबद्ध कामाचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. आपल्या वागण्यातून इतरांची मने जिंकून घ्याल. व्यावसायिक स्तरावर खुश राहाल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
विशाल दृष्टीकोन बाळगावा. तुमच्या कलेला चांगला वाव देता येईल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. परोपकाराचे महत्त्व पटवून द्याल. लेखनाचे कौतुक केले जाईल.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
कमी श्रमात कामे करण्याकडे कल राहील. वारसाहक्काच्या कामांना गती येईल. सासुरवाडीची मदत घेता येईल. व्यापारी वर्ग खुश राहील.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
एकमेकांचे विचार जाणून घ्याल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. जोडीदाराची कर्तव्यदक्षता दिसून येईल. मुलांचे स्वतंत्र विचार जाणून घ्यावेत. क्षुल्लक गोष्टी क्रोधाला कारणीभूत ठरू शकतात.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडतील अशी अपेक्षा ठेऊ नका. काही गोष्टींना मुरड घालावी लागेल. आळस झटकून कामाला लागावे. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. दिवस सुस्तपणात घालवाल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
आवडत्या व्यक्तीच्या सहवासाची ओढ वाढेल. प्रेमभावना वाढीस लागेल. नवीन ओळखी वाढतील. त्यातूनच मैत्रीचे संबंध प्रस्थापित होतील. कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
कौटुंबिक बाबतीत समाधानी असाल. ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. जोडीदाराकडून कौतुक करून घ्याल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
साहित्याची आवड जोपासाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल. कला जोपासण्यासाठी तांत्रिक बाबी जाणून घ्याल. डोकेदुखीचा थोडाफार त्रास जाणवेल.