महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – २७ सप्टेंबर – बँकिंग फ्रॉड पूर्णपणे बंद व्हावेत याकरता आरबीआय (Reserve Bank of India) नेहमी प्रयत्नशील असते. दरम्यान 1 जानेवारी 2021 पासून आरबीआय याकरता एक नवीन सिस्टम लागू करणार आहे. आरबीआयच्या या नव्या योजनेचं नाव ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम’ (Positive Pay System) असणार आहे. याअंतर्गत चेक पेमेंटच्या माध्यमातून 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेसाठी काही माहिती पुन्हा एकदा कन्फर्म करावी लागेल. हे खातेधारकावर असेल की त्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे की नाही. मात्र अशी शक्यता देखील आहे की 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे चेक पेमेंट करायचे असल्यास ही योजना अनिवार्य केली जाईल.
कसे काम करेल पॉझिटिव्ह पे सिस्टम?
या सुविधेअंतर्गत, जी व्यक्ती चेक जारी करेल त्या व्यक्तीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून चेकची तारीख, लाभार्थीचे नाव, प्राप्तकर्ता (Payee) आणि पेमेंटची रक्कम याबाबत पुन्हा एकदा माहिती द्यावी लागेल. चेक जारी करणारी व्यक्ती ही माहिती एसएमएस, मोबाइल App, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून देऊ शकतो.