महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि . २९ सप्टेंबर – मुंबई – सध्या जगभरात कोरोनाव्हायरस धुमाकूळ घालतो आहे. असे एक ना दोन कित्येक व्हायरस आहेत, ज्यांच्यामुळे जीवघेणे असे आजार बळावतात. सॅनिटायझर, डिसइन्फेक्ट, यूव्ही लाइट्स यांचा वापर करून शरीर आणि एखाद्या पृष्ठभागावरील व्हायरसचा आपण नाश करू शकतो. तर शरीरातील व्हायरसचा नाश करण्यासाठी औषधं, लस यांचा वापर केला जातो. मात्र आता या जीवघेण्या व्हायरसचा खात्मा करणारे जीवही सापडले आहेत.
प्रथमच शास्त्रज्ञांना समुद्री सूक्ष्मजीवांचे दोन गट सापडले आहेत. ज्यांचा आहारच विषाणू आहे. प्रोटिस नावाचे हे सूक्ष्मजीव जीवाणूंऐवजी विषाणू खातात. फ्रंटियर्स इन मायक्रोबायॉलॉजीमध्ये या सूक्ष्मजीवांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. उत्तर अमेरिकेजवळील अटलांटिक समुद्र आणि भूमध्य सागरातील स्पेनच्या कॅटालोनियाजवळील आखाती प्रदेशात हे जीव सापडतात.