Horoscope Today दि. २ सप्टेंबर २०२६ ; आज मौल्यवान भेटवस्तू मिळेल….……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ सप्टेंबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
आज आपल्या सौंदर्याचे कौतुक होईल. जुनी भांडणे मिटतील. धडाडीवर संयम ठेवा. भौतिक सुखाचा आनंद घेता येईल. व्यापारात काही सुधारणा कराव्या लागतील.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
मानसिक संतुलन हरवू देऊ नका. पायाच्या दुखण्याकडे लक्ष द्या. काही किरकोळ समस्यांतून मार्ग निघेल. कार्यालयीन सदस्यांशी वादाची शक्यता. मित्रांशी चर्चेतून मार्ग निघेल.

मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope)
व्यक्तिमत्वाची छाप पडण्यात यशस्वी व्हाल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ मिळेल. संयमाने व धीराने निर्णय घ्यावा लागेल. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. वाहनाचे काम निघेल.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
नोकरी व व्यवसायात मोठी संधी चालून येईल. तुमच्या बाबतीत संशय निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. दिनक्रम व्यस्त राहील. मन विचलीत होऊ शकते. भौतिक सुखाची अनुभूति घ्याल.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
नवीन प्रयोगाला यश मिळेल. मित्रांचा सल्ला ग्राह्य मानाल. मौल्यवान भेटवस्तू मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. गोड बोलून कामे साध्य कराल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कष्टाने मान मिळवाल. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क होईल. तुमचा प्रभाव वाढेल. व्यावसायिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. काही खर्च अचानक उद्भवतील.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
बौद्धिक गुण वापरून कामे करावीत. व्यस्त दिनक्रमामुळे थकवा जाणवेल. नोकरदार वर्गाची जबाबदारी वाढेल. आजचा दिवस शुभ राहील. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
विचारपूर्वक सल्ला द्या. पोटाचे विकार त्रस्त करू शकतात. जुनी येणी असतील तर त्याचा पाठपुरावा करा. ऐनवेळी येणार्‍या समस्या सोडवता येतील. आरोग्याची काळजी घ्यावी.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
धार्मिक गोष्टीत स्वत:ला रमवाल. जोडीदाराकडून चांगला लाभ होईल. कार्य सिद्धीस साशंकता नको. आध्यात्मिक कामात रुचि वाढेल. मनापासून जबाबदार्‍या पार पाडाल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
मानसिक आरोग्य टिकवाल. नातेवाईकांशी चांगले धोरण ठेवाल. निर्णय क्षमतेत वाढ होईल. कौटुंबिक मतभेद दूर होतील. चिकाटी सोडून चालणार नाही.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
अकारण खर्चाची शक्यता. मुलांवरील खर्च वाढू शकतो. उगाचच मन खिन्न होण्याची शक्यता. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास महत्त्वाचा ठरेल. नोकरदार वर्गाच्या समस्या दूर होतील.

डिस्क्लेमर: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे. यातील माहिती पूर्णपणे अचूक किंवा सत्य असल्याचा दावा केला जात नाही. महत्त्वाचे निर्णय घेताना संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *