पुण्यातील नमुन्यांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे ‘येवले अमृततुल्य चहा’वर एफडीएची कारवाई

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ ऑक्टोबर -पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाने अल्पावधीतच ‘चहाप्रेमीं’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘येवले अमृततुल्य चहा’ला दणका दिला आहे. मोठ्या प्रमाणावर त्रुटी पुण्यातील नमुन्यांमध्ये आढळल्यामुळे ‘येवले अमृततुल्य चहा’चे राज्यभरातील उत्पादन आणि विक्री बंद ठेवण्याचे आदेश एफडीएने दिले आहेत. पण कंपनीच्या संचालकांनी सर्व अटींची पूर्तता करण्याची हमी दिली आहे.

पुण्यातून ‘येवले चहा’ची चहा पावडर, साखर, चहाचा मसाला असा एकूण सहा लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने विक्रीसाठी पॅकबंद करुन ठेवण्यात आलेला माल जप्त केला आहे. त्याचबरोबर उत्पादन आणि विक्री पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. ही कारवाई जनहित आणि आरोग्याच्या दृष्टीने करण्यात आली आहे.

राज्यभरातील येवले चहाच्या शाखा बंद ठेवण्यास सांगूनही पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाखा सकाळच्या वेळेत सुरु असल्याचे आढळले. येवले अमृततुल्यमध्ये मेलानाईट हा आरोग्याला घातक असणारा घटक आढळून आलेला नाही. या पाहणीमध्ये पॅकिंगमध्ये काही त्रुटी आढळून आल्या असून त्याची आम्ही पूर्तता करत आहोत. सर्व फ्रान्चाईजी सुरु राहतील. ग्राहकांच्या जीवाशी खेळायचा अधिकार आम्हाला नाही. कारखान्यात काही चुका आढळून आल्या असून त्याची पूर्तता आम्ही केली असल्याचे येवले अमृततुल्य चहाचे संचालक नवनाथ येवले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *