जिओचा ४०१ रुपयांचा प्लान, ९० जीबी डेटासोबत Live क्रिकेटही पाहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३ ऑक्टोबर – मुंबई :रिलायन्स जिओ युजर्सचे प्रीपेड ग्राहक असाल आणि तुम्ही एखाद्या चांगल्या प्लानच्या शोधात असाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी या ठिकाणी एक चांगला प्लान आहे. या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच ६ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि लाइव्ह क्रिकेटची मजा सुद्धा पाहता येवू शकते.

जिओचा ४०१ रुपयांचा प्लान
रिलायन्स जिओच्या या ४०१ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज ३ जीबी डेटा प्लस अतिरिक्त ६ जीबी डेटा दिला जात आहे. याप्रमाणे युजर्संना एकूण ९० जीबी डेटाचा वापर करता येवू शकतो. प्लानमध्ये जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात.

पाहा लाइव्ह आयपीएल
या प्लानमध्ये रोज १०० एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा मिळते. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात Disney+ Hotstar ची फ्री मेंबरशीप मिळते. यात आयपीएल शिवाय अनेक कॉन्टेंटची मजा घेता येवू शकते.

एअरटेलचा ४४८ रुपयांचा प्लान
काही सुविधासोबत एअरटेलचा ४४८ रुपयांचा प्लान ऑफर करते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. यात रोज ३ जीबी डेटा, रोज १०० एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग ऑफर केली जाते. तसेच यात एका वर्षासाठी Disney+ Hotstar VIP मेंबरशिप फ्रीमध्ये दिली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *