WhatsApp ;वापरणे होणार आणखी सुलभ ; आणणार 5 जबदरस्त फिचर्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ ऑक्टोबर – मुंबई – जगातील लोकांच्या सर्वात जास्त पसंतीस उतरलेलं मेसेजिंग अ‍ॅप म्हणून व्हॉट्सअ‍ॅपकडे (WhatsApp) पाहिलं जातं. व्हॉट्सअ‍ॅप अतिशय युझर फ्रेंडली अ‍ॅप आहे. युझर्सना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच करत असतं. आपल्या युझर्ससाठी आणखी काही नवी फिचर्स आणण्याच्या तयारीत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर काही खास फिचर अपडेट होण्याची शक्यता ;. असेच काही फिचर्स पाहुयात.

वेब व्हॉट्सअ‍ॅपचा (Web Whatsapp ) आयकॉन
सध्या वर्क फ्रॉम होममुळे अनेक जण घरी बसूनच आपलं काम सांभाळत आहेत. अशावेळी अनेकांना वेब व्हॉट्सअ‍ॅपची गरज भासते. तर या वेब व्हॉट्सअ‍ॅपचा आयकॉन (Icon) अपडेट होण्याची शक्यता आहे.

मीडिया गाइडलाइन्स (Media Guidelines)
व्हॉट्सअ‍ॅपने मीडिया गाइडलाइन्स (Media Guidelines) नावाचं एक फिचरही देण्यास सुरुवात केली आहे. या फिचरमुळे युझर्सना फोटो, व्हिडीओ आणि GIF एडिट करताना स्टिकर्स आणि टेक्स्टसुद्धा अलाइन करण्याची सुविधा प्राप्त होईल.

कॅटलॉग शॉर्टकट
व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कॅटलॉग शॉर्टकट नावाचं एक बटण देण्यात आलं आहे. यामुळे युझर्सना बिझनेस कॅटलॉगचा अ‍ॅक्सेस मिळतो.
WeBetaInfoच्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉईड, बिझनेस आणि IOS अ‍ॅपमध्ये हे फिचर दिलं आहे. हे फिचर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप वेब आणि डेक्टटॉप बेस्ड् अ‍ॅपमध्येही वापरता येणार आहे.

स्टोरेज युझेस सेक्शन
व्हॉट्सअ‍ॅपने Storage Usage सेक्शनही देण्यास सुरुवात केली आहे. या फिचरमुळे मीडियामध्ये कोणत्या फाइल्स डिलिट करायच्या आहेत हे युझर्सना लवकर लक्षात येईल.

ऑलवेज म्युट
व्हॉट्सअ‍ॅप वापरताना आपल्याला सतत मेसेज (Message) येत असतात. सतत मेसेज टोन वाजत राहिल्यामुळे आपलं कामाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. हीच अडचण लक्षात घेऊन व्हॉट्सअ‍ॅपने ऑलवेज म्युट (Always Mute) हे फिचर आणलं आहे.

ज्यामुळे काही पर्सनल चॅट्स आणि ग्रुप चॅट्स कायमचे म्युट करू शकतो. आधी ही सुविधा जास्तीत जास्त एक वर्षासाठी होती. आता नको असलेल्या चॅट्स (Chats) आपण कायमचं म्युट करून ठेऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *