Horoscope Today दि. १२ ऑक्टोबर ; आज फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करा……..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑक्टोबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. घाईने कामे उरकू नका. सहकार्‍यांच्या हातात हात घालून चला. टाकलेले पाऊल मागे घेऊ नका. गुरुतुल्य व्यक्तीकडून प्रेरणा मिळेल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
अकारण पैसा खर्च होऊ शकतो. दिवस उर्जावर्धक राहील. कष्टाला पर्याय नाही. कामे गतीने पूर्णत्वास जातील. मेहनतीचे योग्य फळ मिळेल.

मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
मित्रांमध्ये गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. खाण्यापिण्याची चंगळ राहील.जवळचा प्रवास चांगला राहील. कामाचा अधिक भार येऊ शकतो. जोडीदाराच्या प्रगल्भतेचे कौतुक कराल.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. चटपटीत पदार्थ खाल. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा. नातेवाईकांची गाठ पडेल. जोडीदाराच्या भावना लक्षात घ्या.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. व्यायामाचा कंटाळा करू नका. भावंडांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. दिवस आपल्या इच्छेप्रमाणे घालवाल.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
आपल्या कामात यश मिळेल. नियोजनबद्ध कामे कराल. आवडीची कामे करण्यावर भर द्याल. मनातील निराशाजनक विचार काढून टाका. जोडीदाराशी समजूतदारपणे वागा.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
कौटुंबिक खर्च निघतील. कामाची क्रमवारी ठरवा. बोलण्यातून लोकनवरती प्रभाव पाडाल. झोपेची तक्रार जाणवेल. समस्यांना संयमाने तोंड द्या.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
लोक तुमचा सल्ला विचारायला येतील. अधिकार्‍यांच्या सल्ल्याने वागा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. फक्त कामावरच लक्ष केन्द्रित करा. आर्थिक चिंता मिटेल.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
मदत केल्याचा आनंद मिळवाल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. परोपकाराची भावना जोपासाल. तरुणांच्या सहवासात रमाल. विवाह विषयक बोलणी पुढे सरकतील.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. कमिशन च्या व्यवसायात चांगली कमाई कराल. धार्मिक भावना वाढीस लागेल. गरज नसेल तर प्रवास टाळावा. भावंडांशी मतभेद टाळा.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आव्हानांचा सामना करावा.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका. आत्ममग्न राहाल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *