Horoscope Today दि. १६ ऑक्टोबर ; आज मन विचलीत करणार्‍या घटना घडू शकतात …………… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १६ ऑक्टोबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
घरात सजावटीची कामे कराल. आपल्या स्मरणशक्तीचा फायदा होईल. दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने होईल. धनलाभाचे योग जुळून येतील. मित्रांशी गप्पा मारण्यात वेळ घालवाल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
काही नवीन शिकण्याचा योग येईल. स्वत:ला कामात गुंतवून घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. मित्रांची बाजू जाणून घ्या. घरात टापटीप ठेवाल.

मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
कौटुंबिक मदत लाभेल. दिवस समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामाची अंमलबजावणी कराल. आर्थिक व्यवहारांकडे दुर्लक्ष नको. हस्त कलेसाठी वेळ काढावा.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
हातातील काम जिद्दीने पूर्ण कराल. व्यापार्‍यांची जुनी कामे मार्गी लागतील. घरातील वातावरण खेळकर राहील. नातेवाईकांची गाठ पडेल. सरकारी योजनांकडे लक्ष ठेवा.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
सल्ला मागणार्‍यांना योग्य मार्गदर्शन करा. प्रेमातील व्यक्तींना शुभ दिवस. जवळच्या ठिकाणी फिरायला जाल. समोरील गोष्टीत आनंद माना. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
कामाचा ताण लक्षात घ्यावा. घरगुती गप्पांमध्ये गुंग व्हाल. उत्तम निद्रा सौख्य लाभेल. चर्चेतून मार्ग काढता येईल. जोडीदाराची बाजू जाणून घ्या.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
दिवसभर कामात अडकून राहाल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. सर्वांशी गोडीने बोलाल. झोपेची तक्रार राहील. आजचा दिवस चांगला

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
लहान प्रवास घडेल. दिवस संमिश्र जाईल. रागाला आवर घालावी. मन विचलीत करणार्‍या घटना घडू शकतात. फसवणुकीपासून सावध राहावे.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
हातातील काम मनापासून करावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. तरुण वर्गाकडून काही शिकायला मिळेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक भावना वाढीस लागेल.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
सर्व खात्री करूनच जबाबदारी घ्या. बाहेर फिरताना सतर्क राहावे. धार्मिक ग्रंथांचे वाचन करा. व्यापारीवर्ग खुश राहील.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
नवीन कामासाठी संकल्प करावा. अनावश्यक खर्च टाळावा. बोलताना भान राखावे. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक अडचणींकडे लक्ष द्या.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
विद्यार्थ्यांना नवीन अनुभव मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी सहकारी मदत करतील. अनावश्यक खर्च टाळावा. मनातील निराशेला दूर सारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *