![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ ऑक्टोबर २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
मानसिक विकासासाठी बळ एकजूट करा. मनातील संमिश्र विचार काढून टाका. अधिकारी वर्गाशी मतभेद संभवतात. कौटुंबिक सदस्यांची साथ मिळेल. दिवसभर कामाची गडबड राहील.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
घरातील कामासाठी पैसे खर्च होतील. दिवस आव्हानात्मक असेल. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. महागड्या वस्तु सांभाळून ठेवा. सावधगिरीने परिस्थिती हाताळा.
मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
कुटुंबात मान वाढेल. तुमच्या कल्पकतेचे कौतुक केले जाईल. प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करा. निश्चयाने कामे तडीस न्यावीत. मोसमी आजार त्रस्त करू शकतात.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
आजारांकडे दुर्लक्ष करू नका. लहान गोष्टी सुद्धा अंगावर काढूनका. कोणतीही जोखीम पत्करताना सावध रहा. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. जोडीदाराशी विचार विनिमय करा.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
दिवस चांगला जाईल. मेहनतीचे चीज होईल. उदार मनाने क्षमाशील राहाल. जोडीदाराची मदत घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
आळसात दिवस घालवू नका. नातेवाईक भेटतील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरेल. जोडीदाराशी जुळवून घ्यावे.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
आपले मत सर्वांसमोर मांडाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नवीन योजनेवर काम कराल. घरातील जबाबदारी अंगावर पडेल. आवडीसाठी खर्च कराल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
नातेवाईकांशी जुळवून घ्या. भावनात्मक प्रसंग घडू शकतात. विचारपूर्वक निर्णय घ्या. गोड बोलून कामे करून घ्या. नवीन ओळख होईल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व दाखवून द्या. त्यातून लाभच होईल. नातेवाईक आनंदवार्ता देतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. सकारात्मकता वाढीस लागेल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
भावंडांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. दिवस मर्जीप्रमाणे घालवाल. मनातील नकारात्मकता काढून टाका. धार्मिक गोष्टीत सहभागी व्हा. कमिशनचा लाभ मिळेल.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
मनातील निराशा झटकून टाका. ध्यानधारणेत मन रमवा. तणावाखाली नवीन गोष्ट करू नका. कुटुंबातील सदस्यांची साथ मिळेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
नवीन संधी चालून येतील. योग्य वेळी पाऊले उचला. परंतु सारासार विचारांची जोड घ्या. क्षुल्लक वादापासून दूर रहा. दूरच्या मित्रांशी संपर्क साधाल.