![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ ऑक्टोबर २०२६ ।।
मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. नोकरीत मान मिळेल. नियोजित कामात प्रयत्नशील राहावे. जुनी येणी प्राप्त होतील. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.
वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
कलेत प्राविण्य दाखवाल. व्यवसायात खबरदारी घ्यावी. कामात धांदल टाळावी. एखाद्यावर अति विश्वास टाळावा. सर गोष्टींचा आढावा घ्यावा.
मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
जोडीदाराकडून फायदा होईल. लहान प्रवास घडतील. करियर बदलला काळ अनुकूल. कामासंदर्भात तज्ञ व ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्यावा. जोडीदाराचे मत उपयुक्त ठरेल.
कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
भागीदारीतील निर्णय धीराने घ्या. तडकाफडकी कोणतेही काम करू नका. नवीन प्रकल्प लक्ष वेधून घेईल. एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा. सारासार विचार करून निर्णय घ्यावा.
सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
तुमच्या कालगुणांना वाव मिळेल. ओळखीच्या लोकात लोकप्रिय व्हाल. तुमचा जनसंपर्क वाढेल. अति उत्साहात निर्णय घेऊ नका. कामाची पूर्व तयारी करावी लागेल.
कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
घरात धार्मिक कार्य घडेल. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. मानसिक ताण वाढू देऊ नका. जोडीदारापासून गोष्टी लपवू नका. प्रेमातील व्यक्तींनी सावधगिरी बाळगावी.
तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
घरासाठी पैसा खर्च कराल. मित्रांचा प्रभाव राहील. त्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग टाळावेत. बोलण्यातून इतरांवर प्रभाव पाडाल.
वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
जुनी येणी वसूल होतील. मानसिक शांतता जपावी. मनातील इच्छा प्रबळ राहील. काही मूलभूत गोष्टीत परिवर्तन करावे लागेल. कौटुंबिक जबाबदारी प्राधान्याने पार पाडाल.
धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
सामाजिक मान वाढेल. घरातील प्रश्न संयमाने सोडवा. भावंडांशी चर्चा करावी. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींकडे लक्ष वेधले जाईल. जवळच्या ठिकाणी फेरफटका मारण्याची प्रबळ इच्छा होईल.
मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
व्यायामाची संगत सोडू नका. कौटुंबिक कामात बराच वेळ घालवाल. शारीरिक अस्वस्थता कमी होईल. मुलांच्या इच्छा जाणून घ्याव्यात. खरेदीचे योग आहेत.
कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
भावनिक गुंतागुंतीत अडकू नका. आपले कर्तृत्व दाखवून द्या. मनोरंजनात वेळ घालवा. कठोर प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर रहा. जोडीदाराची साथ मिळेल.
मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
अनाठायी खर्च वाढू शकतो. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. मन काहीसे विचलीत राहील. क्रोधाच्या आहारी जाऊ नका. वैवाहिक जीवनात मतभेद संभवतात.