Horoscope Today दि. ०१ नोव्हेंबर ; आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका……..……… ..; पहा बारा राशींचं भविष्य —

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.०१ नोव्हेंबर २०२६ ।।

मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope)
अति उत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope)
वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मिथुन राशीचे शिभविष्य (Gemini Today Horoscope)
आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.

कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope)
लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.

सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope)
कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.

कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope)
जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope)
दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका.

वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope)
शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.

धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope)
विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope)
कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.

कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope)
काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.

मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope)
व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *