![]()
७९व्या निरंकारी संत समागमाचा समालख्यात भव्य शुभारंभ; लाखो भक्तांची उपस्थिती
महाराष्ट्र 24 -ऑनलाईन, दि. २४ ऑक्टोबर : माणूस जागा आहे की केवळ जागेपणाचा आव आणतो, हा प्रश्नच मुळी अंतर्मुख करणारा आहे! परमात्म्याच्या अस्तित्वाची प्रत्येक क्षणी अनुभूती घेऊन आध्यात्मिकता आचरणात आणली, तरच खरी जागृती येते, असा मानवतेचा मोलाचा संदेश सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी दिला. ७९व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा प्रारंभ शुक्रवारी समालखा येथे श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात झाला.
२३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या चार दिवसीय समागमाला देश-विदेशांतून लाखो श्रद्धाळू उपस्थित राहिले आहेत. सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या सान्निध्यात सुरू झालेल्या या सोहळ्याने आध्यात्मिक जागृती, मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.
सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज म्हणाल्या की, संत-महात्म्यांच्या एकत्र येण्यामागे केवळ धार्मिक सोहळा साजरा करणे हा उद्देश नसून, मानवी मनात आध्यात्मिक जाणीव जागृत ठेवणे हे खरे ध्येय आहे. घर, कुटुंब, समाज आणि देशाप्रती असलेली कर्तव्ये प्रामाणिकपणे पार पाडतानाच माणसाने जागरूक जागतिक नागरिक बनले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जात, पात, भाषा, प्रदेश आणि स्वभावाचे भेद बाजूला ठेवून प्रत्येकाला