महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ७ ऑक्टोबर – पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘आत्मनिर्भर भारत आणि नवे शैक्षणिक धोरण’ या विषयावर आज पुणेकरांशी संवाद साधणार होते. मात्र, काही तांतिक कारणांमुळे हा संवादाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि ‘आयसीसीआर’तर्फे लोकमान्य टिळक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित वेबीनारमध्ये पंतप्रधान मार्गदर्शन करणार होते.
आज बुधवारी (दि. ७) दुपारी ४.३० वाजता पीएम मोदी संवाद साधणार होते. पण काही तांत्रिक कारणांमुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आयोजकांनी याची माहिती दिली आहे. दरम्यान, १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टीळक यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले होते, त्यानंतर आज नरेंद्र मोदी हे यामध्ये संबोधित करणार होते. पण आजचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. पुढील कार्यक्रम कधी होणार आहे याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
