कुलगामध्ये जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – दि. १० ऑक्टो . – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. यानंतर जवानांनी एम-4 रायफल आणि एक पिस्तुल हस्तगत केले. जवानांकडून या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

चिंगम परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती जवानांना मिळाली होती. त्यानंतर परिसरात वेढा देऊन शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान परिसरात दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला. जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. चकमक झाल्यानंतर देखील परिसरात जवानांकडून शोधीमोहीम राबवली जात आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील सुगन झैनापोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली होती. या चकमकीत देखील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं होतं.

काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलं असून, दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *