उत्तर कोरियाने शनिवारी सत्तारुढ पक्षाचा 75 वा स्थापना दिन साजरा: सामर्थ्याचे प्रदर्शन

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १२ऑक्टो . – प्योंगयांग – उत्तर कोरियाने शनिवारी सत्तारुढ पक्षाचा 75 वा स्थापना दिन साजरा केला आहे. यानिमित्त आयोजित सैन्यसंचलनात देशाचे नवे आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रदर्शित करण्यात आले आहे. याचबरोबर अन्य शस्त्रास्त्रsही सादर करण्यात आली आहेत.

नव्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राला ट्रान्सपोर्टर इरेक्टर लाँचरद्वारे (टीईएल) संचलनात आणले गेले. हे नवे क्षेपणास्त्र उत्तर कोरियाकडे यापूर्वीच असलेल्या ह्यसोंग-15 क्षेपणास्त्रापेक्षाही लांब आहे. ह्यसोंग क्षेपणास्त्र 12 हजार 874 किलोमीटरपर्यंत वार करू शकते.

उत्तर कोरियात 2018 नंतर पहिल्यांदाच सैन्य संचलन आयोजित करण्यात आले होते. उत्तर कोरियाने या संचलनात सबमरीन-लाँच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रही सादर केले आहे. रशियात तयार करण्यात आलेले क्षेपणास्त्र इस्कँडर आणि अनेक अग्निबाणही प्रदर्शित केले आहे.

सामर्थ्य वाढवत राहू

आम्ही कुठल्याही युद्धापासून वाचण्यासाठी स्वतःचे सामर्थ्य वाढविणे सुरूच ठेवणार आहोत. ही शस्त्रास्त्रs पूर्णपणे आमच्या सुरक्षेसाठी आहेत. त्यांचा कधीही चुकीचा किंवा विनाकारण वापर करणार नाही. परंतु कुठलेही सैन्य आम्हाला धाक दाखवू पाहत असल्यास त्याच्या विरोधात स्वतःच्या पूर्णबळानिशी हल्ला करणार असल्याचे उद्गार हुकुमशहा किम जोंग उन यांनी काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *