हॉनरची दोन नवी स्मार्ट घडय़ाळे बाजारात

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसंस्था – दि. १२ऑक्टो . – पुणे -हुवाई कंझ्युमर ग्रुपची कंपनी हॉनर यांची दोन नवी स्मार्ट घडय़ाळे नुकतीच भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली. इएस व जीएस प्रो या नावाने ही स्मार्ट घडय़ाळे भारतात दाखल झाली आहेत. इएस वॉच 1.6 इंच अमोलेड डिस्प्लेच्या सुविधांनी युक्त असणार असून जीएस प्रो 25 दिवसांच्या बॅटरी क्षमतेसह सादर करण्यात आले आहे.

तंत्रज्ञान व नाविन्यतेत हॉनरने आपला ब्रँड चांगलाच लोकप्रिय बनवला आहे. त्यांच्या नव्या उत्पादनांवर ग्राहकांचे नेहमीच लक्ष लागून राहिलेले असते. त्यांच्या वेअरेबल उत्पादनांना भारतासह इतर देशांनीही पसंती दर्शवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *