(Corona Vaccine) शेवटी ठरलंच! भारतात दिली जाणार रशियन लस;

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – मुंबई – दि. १८ ऑक्टो -ऑक्सफोर्डच्या कोरोना लशीनंतर आता भारतात रशियाचीही लस ( दिली जाणार आहे. Sputnik V लशीचं भारतात ट्रायल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज कंपनीला  ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) ट्रायलसाठी परवानगी दिली आहे.

रशियाच्या गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमिओलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने Sputnik V ही लस तयार केली आहे. रशियामध्ये सध्या या लशीचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. भारतातही या लशीचं ट्रायल करण्यासाठी भारताच्या डॉ. रेड्डीज कंपनीने रशियन डायरेक्ट इन्व्हेसमेंट फंडशी (RDIF-Russian Direct Investment Fund) करार केला आहे.

भारतात या लशीचं ट्रायल करण्यासाठी डॉ. रेड्डीजने डीजीसीआयकडे अर्ज केला होता. डीजीसीयीआने सुरुवातीला परवानगी दिली नाही. त्यानंतर कंपनीने दुसऱ्यांदा अर्ज केला आणि आता या लशीच्या ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

डॉ. रेड्डी लेबोरेटरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि को-चेअरमन जीव्ही प्रसाद यांनी सांगितलं, “पूर्ण प्रक्रियेत DCGI च्या मार्गदर्शनांचा आम्ही स्वीकार करत आहोत. भारतात आम्हाला ट्रायल सुरू करायला परवानगी मिळाली ही खूप मोठी बाब आहे. महासाथीचा सामना करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लस आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत”

रशियाची तिसरी कोरोना लस चुमाकोव्ह सेंटर ऑफ रशियन अॅकडमी ऑफ सायन्सेजने तयार करण्यात आली आहे. या लशीचं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल सुरू आहे. पहिला टप्पा 6 ऑक्टोबरला सुरू झाला. त्यावेळी 15 जणांना ही लस देण्यात आली आहे. यापैकी कुणामध्येही लशीचा दुष्परिणाम दिसलेला नाही, असं सांगितलं जातं आहे. या लशीचं दुसऱ्या टप्प्यातील ट्रायल 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. त्यावेळी 285 जणांना लस दिली जाणार असल्याचं सांगितलं जातं आहे. क्लिनिकल ट्रायल डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. हिंदुस्थान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या लशीला डिसेंबर 2020 पर्यंत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *