महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – पुणे – दि. २०ऑक्टो – :तुम्ही आजाराने वैतागला असाल तर घाबरून जाऊ नका.कारण आता मधानेदेखील त्यावर उपचार करू शकता. घरगुती उपयांमध्ये मधाचा नेहमी उल्लेख होत असतो. गुणांसह मिठासपणा कोणत्या पदार्थात आढळत असेल तर तो आहे मध. तसे पाहिले तर मध प्रत्येक मोसमात लाभदायक असतो. मात्र उन्हाळ्यात तो जास्त उपयुक्त ठरतो.
रोग प्रतिकारक गुणांमुळे मध आरोग्यास मदत तर करतोच पण त्याचबरोबर रूप-रंग उजळण्यातही उपयोगी आहे. अलीकडेच जर्मनीत झालेल्या एका अभ्यासानुसार मधात आढळणारा अँटी ऑक्सीडेट घटक शरीरच्या पेशी क्षीण होण्यापासून रक्षण करतो.बहुधा त्यामुळेच जुन्या काळात लोक भरपूर प्रमाणात मध सेवन करीत असत. आजही अरब देशांतील लोक आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे मध सेवन करतात. मधात मोठ्या प्रमाणात कॅलरी आढळतात. आरोग्यासाठी ती खूप गुणकारी मानली जाते.