देशात दुसरा लॉकडाऊन लागणार का ? अमित शाह म्हणतात…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २०ऑक्टो – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झी न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर खुलासा केला. कोरोना पॉझिटीव्ह असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली ? क्वारंटाईन दरम्यान अशा गोष्टींसाठी वेळ दिला ज्या करण्यास दररोज वेळ मिळायचा नाही. यावेळी अमित शाह यांनी अशा प्रश्नाचं उत्तर दिलं ज्याची वाट पूर्ण देश पाहत होता.. भारतात पुन्हा लॉकडाऊन लागणार का ? या प्रश्नाच त्यांनी उत्तर दिलं.

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आम्ही मोठ अभियान चालवतोय. यातून प्रत्येक गाव, शाळा, अंगणवाडी, पोलीस स्थानक, आरोग्य कर्मचारी, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अमित शाह म्हणाले. कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत दोन फूट अंतर राखणं आणि हाथ स्वच्छ ठेवणे, मास्क वापरणे या ती गोष्टी कराव्या लागतील असे ते म्हणाले.

लॉकडाऊनमध्ये आम्ही आरोग्य व्यवस्था सुधारली असे ते म्हणाले. जगभरातील सर्वात चांगली आरोग्य सुविधा भारतात मिळतेय. कोणत्या स्टेजवर कोणता रिपोर्ट काढायचा आणि कोणते औषध द्यायचे ? याचा रिपोर्ट बनल्याचे ते म्हणाले. जेव्हा देशात लॉकडाऊन लागला तेव्हा विरोधी पक्षनेते विशेषत: राहुल गांधी यांनी लॉकडाऊन लावण्याची गरज नव्हती असे म्हटले होते. पण लॉकडाऊन लावला नसता तर कोरोनामुळे आरोग्य क्षेत्रातील लाखो-कोटी जण दगावले असते असे अमित शाह यावेळी म्हणाले.

खूप काळ मला लिखाण आणि वाचन करण्यास वेळ मिळाला नव्हता. पण दीड महिना मला तो वेळ मिळाला. मागे जाऊन पाहण्याचा, विचार करण्याचा विचार, आपलं कुठे काय चुकलं ? ती चूक पुढे होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचा वेळ मिळाल्याचे अमित शाह म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *