‘मास्क’च्या किंमतींवर सरकारचं नियंत्रण; काळाबाजार केला तर खबरदार,

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २१ ऑक्टो – : कोरोनावर अजुनही औषध सापडलेलं नसल्याने काळजी घेणे हाच सध्या ऐकमेव उपाय आहे. त्यामुळे मास्क आणि सॅनिटायजरला कधी नव्हे ते महत्त्व आलं होतं. त्यामुळे मास्कची मागणी प्रचंड वाढली होती. वाट्टेल त्या किंमतीमध्ये मास्क विकले जात होते आणि लोकही ते खरेदी करत होते. हा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने आता 8 महिन्यानंतर नियम करत त्याच्यावर नियंत्रण आणलं आहे. आता मनमानी पद्धतीने मास्क विकता येणार नाहीत.जास्त किंमतीमध्ये मास्कची विक्री होत असेल तर आता कारवाई करण्यात येणार आहे. ‘मास्क’चे नवे दर 3 रूपयांपासून ते 125 रुपयांपर्यंत असणार आहेत. यात N95 मास्कचाही समावेश आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या कोरोना रुग्णांमध्ये सुरू असलेली घसरण कायम आहे. मृत्यूच्या संख्येतही घट दिसून येत आहे. मंगळवारी (20 ऑक्टोबर) दिवसभरात राज्यात 8,151 नवे रुग्ण आढळून आलेत. तर 213 जणांचा मृत्यू झाला. राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 16,09,516 एवढी झाली आहे. तर मृत्यूचा आकडा 42,453 एवढा झालाय. गेल्या 24 तासांमध्ये 7 हजार 429 जणांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे रिकव्हरी रेट हा 86.5 एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1,74,265 एवढ्या लोकांवर उपचार सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नागरीकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. सणासुदीच्या या दिवसांमध्ये बाजारातसुद्धा अनेक दिवसांनी उत्साह दिसत आहे. पण विसरू नका, लॉकडाऊन संपला असला तरी व्हायरस गेलेला नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi speech) देशवासीयांना सावध केलं.

प्रत्येक भारतीयाच्या प्रयत्नामुळे कित्येक महिन्यानंतर भारतात साथ आटोक्यात येत आहे. ही परिस्थिती बिघडू द्यायची नाही. मृत्यूदर कमी आहे, बरं होण्याचं प्रमाण जास्त आहे. साडेपाच हजार लोकांना Coronavirus ची लागण झाली आहे. हे प्रमाण इतर देशांच्या मानाने कमी आहे. पण ही वेळ सावध राहायची आहे, असं पंतप्रधान म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *