खडसेंचे राष्ट्रवादी प्रवेशाचे‌ स्पष्ट संकेत

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – मुंबई – दि. २१ ऑक्टो – : भाजपचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिकता बाकी आहे. कारण जयंत पाटील यांनी मोदींवर टीका करणारे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले आहे. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश जवळपास निश्चित असून त्यांच्यासोबत आजी-माजी आमदार आणि पदाधिकारी देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत शरद पवारांनी देखील दिले होते, त्यानंतर एकनाथ खडसेंनी देखील यावर खुद्द संकेत दिले आहेत.

जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं की, आजच्या भाषणात पंतप्रधानांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला. खडसेंनी हे ट्विट रिट्विट करत आपल्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता खरी ठरवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *