ब्रिटिश ज्योतिष ; कोरोना लस येणार नाही आणि डोनाल्ड ट्रम्पही पराभूत होतील’

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – लंडन – दि. २१ ऑक्टो – : कोरोनावरून सध्या जगभर चर्चा सुरू असून ती महामारी नेमकी कधी जाणार? यावर लस कधी येणार? यासह ही लस आलीच तर ती आपल्याला कधी मिळणार असे अनेक प्रश्न भारतीयांसह जगभरातील नागरिकांना पडला आहे. यावरच आता एका ब्रिटिश ज्योतिष्याने एक भविष्यवाणी केली आहे. कोरोना जगात अजून किती दिवस राहील, कोरोना ब्रिटनमध्ये अजून किती दिवस असेल आणि अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणूकांत काय होईल यावरही या ज्योतिष्याने भाष्य केले आहे. युके मिररने दिलेल्या माहितीनुसार ब्रिटिश ज्योतिष जेसिका यांनी फेब्रुवारीत कोरोना अख्या जगाचा खात्मा करेल असा दावा केला होता. त्यावेळी त्यांच्या या दाव्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता.

लंडन सोडून तस्मानियात गेल्या राहायलाब्रिटिश ज्योतिष्य जेसिका यांनी आपल्या भविष्यावाणीवर इतका विश्वास होता की, त्यांनी मार्च २०२० मध्ये आयोजित केलेली मोठी पार्टी रद्द केली. इतकेच नव्हे तर त्यांनी लंडनमध्यील आपले घर सोडले आणि टास्मानियाला राहायला गेल्या. त्या अजूनही तेथे आपल्या दोन कुत्री आणि एका कोंबडीसह राहतात.

‘कोरोनावर लस बनणार नाही ज्योतिष जेसिका यांनी डेली मेलशी बोलताना दावा केला की, पुढील वर्षापर्यंत ब्रिटनमधील कोरोना जवळजवळ नाहीसा होईल. संपूर्ण जगाला कोरोनावर काम करावे लागेल. याचबरोबर त्यांना असाही दावा केला की, कोरोनावर कोणतीही लस येणार नाही. यामुळे आपल्या सर्वांना कोरोना सोबतच जगावे लागणार आहे.

ट्रम्प हे अमेरिकेचे पुढील अध्यक्ष नसणार

जेसिका यांनी अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणूकांत काय होईल यावरही भाष्य करताना, अमेरिकेत सध्या गोष्टी सुरळीत नाहीत आणि निवडणुकांनाही उशीर होऊ शकेल. या निवडणूकीनंतर अमेरिकेत नवीन नेता येईल असा दावा केला. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ही चांगली बातमी नाही. ते अमेरिकेचे अध्यक्ष होणार नाही, असेही जेसिका त्यांनी म्हटले आहे.

‘ब्रेक्झिट’वरूनही मोठा दावा जेसिका एडम्स यांनी ब्रेक्झिटवरूनही मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ब्रिटन चार वेगवेगळ्या देशात विभागला जाईल. तसेच ब्रिटनसाठी जानेवारी २०२१ ही तारीख लक्षात राहणारी आणि लिहून ठेवणारी असेल. ही तारीख ब्रिटनला रोमन आक्रमणच्या आधी २००० वर्षांत घेऊन जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *