बळीराजावर संकट ; लाखोंचं नुकसान झालं…! अन् मुख्यमंत्र्यांनी दिले फक्त ३ हजार ८०० रुपये; शेतकरी संतप्त

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – सोलापूर – दि. २१ ऑक्टो – : परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतक-यांना बसला आहे, अतिवृष्टीमुळे अनेकांच्या शेतजमिनीत पाणी शिरले, पुरामुळे जनावरांचा चारा वाहून गेला, घरं कोसळली, शेतक-यांवर डोंगराएवढं संकट कोसळलं, यात शेतक-यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोलापूरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या दौ-यात काही शेतक-यांना मदतीसाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले होते. पावसामुळे शेतक-यांचे सर्वकाही हिरावून घेतलंय, सोलापूरच्या रामपूरमध्ये नुकसानग्रस्त शेतक-यांच्या हाती केवळ ३ हजार ८०० रुपयांचा धनादेश दिला आहे. लहान लेकरं उपाशी बसलेत, धान्य वाहून गेले आहे, ३-४ लाखांचे नुकसान झालंय, एवढा तरी चेक कशाला दिलाय? तुमचा चेक घेऊन जा अशा शब्दात शेतक-यांनी संतप्त भावना व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *