‘पराभव झाला तर देश सोडावा लागेल’

Spread the love

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – वॉशिंग्टन – दि. २१ ऑक्टो – : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात आहे. येत्या 3 नोव्हेंबरला अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरींनी वेग घेतल्याचे दिसून येत आहे. वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आता मतदारांना भावनिक साद घालत आहेत. जो बायडेन यांच्याविरोधात निवडणूक हरलो, तर मला अमेरिका सोडावी लागेल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जॉर्जिया माकॉन येथील प्रचारसभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

रिपब्लिकन पक्षाकडून विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बायडेन निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवारांकडून परस्परांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. जॉर्जिया माकॉन येथील प्रचारसभेत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार बायडेन यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. राष्ट्राध्यक्षीय राजकारणाच्या इतिहासात मी एका वाईट उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे, असे ट्रम्प म्हणाले. तसेच “या निवडणुकीत माझा पराभव झाला तर राजकारणाच्या इतिहासात एका वाईट उमेदवाराकडून माझा पराभव झाला असेच मी आयुष्यभर म्हणत राहीन. मला अजिबात चांगले वाटणार नाही’’ असे बोलतानाच ‘मला कदाचित देशही सोडावा लागेल’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *