स्टेट बँक ; गृहकर्ज होणार स्वस्त

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि . २२ ऑक्टो – भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असणाऱया स्टेट बँक ऑफ इंडियाने गृहकर्जावरील व्याजदरात पाव टक्का कपात करण्याचा निर्णय घोषित केला आहे. 75 लाखांहून अधिक कर्ज घेतलेल्यांना लाभ होणार असून त्यांचा मासिक हप्ता यामुळे कमी होणार आहे. या सवलतीचा लाभ गृहकर्जधारकाच्या सीबील स्कोरवर अवलंबून राहणार असून त्यांनी यासाठी योनोच्या माध्यमातून कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे.

नुकतीच स्टेट बँकेने गृहकर्जव्याजदरातील कपातीची घोषणा सर्व गृहकर्जधारकांसाठी केली होती. मागच्या घोषणेत पेडिट स्कोअरच्या आधारावर 0.1 टक्का व्याजकपात करण्यात आली होती. ती 30 लाख ते 2 कोटीपर्यंत गृहकर्ज घेतलेल्यांसाठी घोषित करण्यात आली होती. आता ही व्याजकपात 0.2 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर ‘योनो’च्या माध्यमातून कर्ज घेतलेल्यांसाठी ती आणखी 0.05 टक्के जास्त असल्याचे दिसून येते.

असे असतील नवे व्याजदर

घोषित करण्यात आलेली व्याजकपात धरून आता स्टेट बँकेच्या गृहकर्जांवरील व्याज 30 लाखांपर्यंतच्या कर्जांसाठी सर्वसाधारणपणे 6.9 टक्के तर त्यापुढील रकमेच्या कर्जांसाठी सर्वसाधारणपणे दर 7 टक्के असेल, असे सांगण्यात आले.

सर्वात कमी व्याजदर

स्टेट बँकेचे गृहकर्ज व्याजदर सर्वात कमी आहेत. यामुळे घर खरेदी करणाऱयांना प्रोत्साहन मिळून गृहबांधणी उद्योगालाही पाठबळ मिळेल, असा विश्वास बँकेच्या किरकोळ कर्ज आणि डिजिटल विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सी. एस. शेट्टी यांनी व्यक्त केला. डिजिटल कर्जाला प्रोत्साहन देण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा व्यवहारांमध्ये आता वाढ होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *