मेट्रो 2 ब चे काम डिसेंबरपासून ट्रॅकवर येणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – प्रतिनिधी – दि. २६ ऑक्टो – मुंबई-गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रो 2 ब मार्गाचे बंद पडलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी एमएमआरडीएकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी नव्या कंत्राटदारांची नियुक्ती प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यावर आली आहे. कारशेडच्या कामासाठी कंत्राटदार निवडला गेला असून उर्वरित दोन पॅकेजचे कंत्राटदार येत्या महिन्याभरात निवडले जातील. त्यानंतर डिसेंबरपूर्वी हे काम पुन्हा ट्रॅकवर येईल अशी माहिती एमएमआरडीएतील सुत्रांनी दिली.

मेट्रो 2 ब ही मार्गिका आँक्टोबर, 2022 पासून कार्यान्वीत करण्याचे मुळ नियोजन होते. मात्र, सिंपलेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, सिएए व्हेन्चर्स आणि एमबीझेड या कंपन्याचे कंत्राट रद्द केल्यानंतर त्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 93 टक्के शिल्लक काम वेळेत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएकडून आता प्रयत्न सुरु झाले आहेत. डी. एन. नगर ते मानखुर्द (मेट्रो दोन ब) या मार्गिकेवरील कंत्राटदारांना एमएमआरडीएने अत्यंत संथ गतीने काम करणा-या कंत्राटदारांना फेब्रुवारी महिन्यांत बाहेरचा रस्ता दाखवला होता. या नंतर दोन वेळा काढलेल्या निविदांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर या कामांमध्ये वाकोला नाला, कलानगर आणि मिठी नदी या तीन ठिकणीच्या आयकॉनीक मकेबल ब्रिजफच्या उभारणीचा समावेश करणे गरजेचे असल्याचा साक्षात्कार एमएमआरडीएला झाला. त्यामुळे तीन पैकी दोन कामांच्या निविदा आँगस्ट महिन्यांत रद्द करून नव्याने प्रक्रिया सुरू झाली.

डी एन नगर ते एमटीएनएलपर्यंतच्या पॅकेज सी -101 (1058.71 कोटी), एमटीएनएल ते डायमंड गार्डन, चेंबुरपर्यंतच्या पॅकेज सी -102 (474 कोटी) आणि मानखुर्द डेपो पॅकेज सी- 103 (464 कोटी) अशी ही तीन पॅकेजमधली कामे आहेत. त्यापैकी डेपोच्या कामासाठी आहलूवालिया या कंपनीची नुकतीच नियुक्ती झाली आहे. उर्वरित दोन टप्प्यांसाठी अँफकाँन्स इन्फ्रास्ट्रक्चर, जे कुमार इन्फ्राप्रोजेक्ट, लार्सन अँण्ड टूब्रो तसेच एनसीसी लि. या कंपन्या तांत्रिक आघाड्यांवर पात्र ठरल्या आहेत. त्यांचे आर्थिक देकार उघडून लघूत्तम निविदाकाराची निवड लवकरच अपेक्षित असून येत्या डिसेंबरपुर्वीच कामाला सुरुवात करण्याचा एमएमआरडीए चा विचार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *